गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद विकासपुरुष विजय वडेट्टीवार यांनाच देण्यात यावे.. युवक काँग्रेसच्या वतीने आरमोरी येथील इंदिरा गांधी चौकात नारेबाजी व पोस्टर दाखवत निदर्शने…

142

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

आरमोरी :- जिल्हयाचा विकास झपाटयाने करावयाचा असेल तर गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्रीपद राज्याचे बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी युवक काॅंग्रेस विधान सभा आरमोरी यांनी केली आहे. ही मागणी केवळ काॅंग्रेस कार्यकत्यांची नसून समस्त जिल्हावासीयांची असून यााबाबत राज्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे मिलींद खोब्रागडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे .

आज युवक काँग्रेसच्या वतिने आरमोरी येथील इंदिरा गांधी चौक तसेच मोटार स्टँड येथे पोस्टर घेऊन वडेट्टीवार यानाच जिल्ह्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात यावे अशी नारे बाजी करण्यात आली. गडचिरोली ही ना. विजय वडेट्टीवारांची कर्मभूमी आहे. त्यांची राजकीय जडणघडण या जिल्हयातूनच झाली. त्यांना जिल्हयातील समस्यांची जाण आहे. जिल्हयाचा विकास घडून यावा याबाबत त्यांची तळमळ आहे. निसर्गाने गडचिरोली जिल्हयाला भरभरून दिले आहे. परंतू या येथील उपलब्ध साधनसंपत्तीवर आधारीत उद्योग निर्माण न झाल्याने जिल्हा उद्योग विरहीत व मागासलेला आहे. जिल्हयाचा विकास घडवून आणायचा असेल तर धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्हयातील समस्या शासनाच्या दरबारी लावून धरणाऱ्या नेत्याची गरज असून ही क्षमता ना.वडेट्टीवार यांच्यामध्ये आहे, असे या पत्रांमध्ये यांनी स्पष्ट केले आहे.

मागील तीन.-चार महिन्याच्या कालावधीत ना.वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्यामुळे या दोन्ही जिल्हयात कोरोना नित्रंणात आहे. ना.वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी जिल्हयाच्या विकासाबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले आणि त्यांची कार्यवाही शासनस्तरावर सुरू आहे. त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे मेडीकल काॅलेज मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर वनजमिन मिळण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांसाठी खत कमी पडू नये म्हणून आधीच उपयोजना केलं आहे.

जिल्हयातील ओबीसीचे आरक्षण पुर्ववत १९ टक्के लागू करण्यासाठी शासनाकडे जोर लावला आहे. यामुळेच शासनाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमितीे नेमली आहे. अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यां प्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत महाज्योती नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वीत करण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावली.

अतिदुर्गम भागात रस्ते पुलांसाठी दरवर्षी 50 कोटींचा निधी मंजूर करून दिला आहे. ना.वडेटीवार यांना गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची तळमळ असून त्यांनी चंद्रपूर बरोबरच गडचिरोलीचे पालत्व स्विकारण्यास तयार असल्याचे त्यांचे अनेकदा बोलून दाखविले आहे. उद्योग विरहित जिल्हा असल्याने जिल्ह्यात बेरोजगारीने कळस घातला आहे जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी विकासाची तळमळ व धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्ह्यातील समस्यांचा शासनाच्या दरबारी लावून धरणाऱ्या नेत्याची गरज या जिल्ह्याला आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जिल्हयाचा विकास साधायचा असेल तर ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी युवक काँग्रेस कडून मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व काँग्रेस अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे केली आहे.

त्यावेळी उपस्थित राजू गारोदे गडचिरोली जिल्हाध्यक्ष सेवादल, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, अमिनभाई शेख, महेशभाऊ तितिरमारे, युवक काँग्रेस विधान सभा महासचिव निलेश अंबादे, राकेश वाटगुरे,भूपेश वाकड़े, मंथन ढिडरे, रूपेश जौजालकर, गोलू गोडरवार, श्रेयश फुलजले, सारंग जाभूळे, पंकज मोंगरकार,अरुण देवीकर, बंडु खोडवे इंजेवारी,आणि युवक काँग्रेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.