ना. गडकरींनी दिलेले ते ४ ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वणी विधानसभा क्षेत्रातील रुग्णांच्या सेवेत, वणी ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट चे साहित्य दाखल, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश

40

 

वणी :- परशुराम पोटे

वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव, झरी तालुक्यात कोरोना रुग्णांची चिंताजनक वाढ होत आहे. या क्षेत्रातील कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी ना. नितीनजी गडकरी यांचेकडे ऑक्सिजन निर्मितीचे सयंत्र देण्याची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत ना. गडकरी यांनी पहिल्या टप्प्यात ४ सयंत्रे दिली आहेत. कोरोनाच्या विळख्यातून या परिसरातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आ. बोदकुरवार यांचे सतत प्रयत्न सुरू असून त्यांच्या प्रयत्नामुळेच ऑक्सिजन प्लांट चे साहित्य ग्रामिण रुग्णालय वणी येथे धडकले असुन आमदारांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.
ना. गडकरी यांच्या कडून मिळालेल्या ४ सयंत्रामधून वणी शहरासाठी एक तर एक वणी ग्रामिण भागाकरीता कायर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपुर्द करण्याय आले असुन, इतर दोन सयंत्र झरी व मारेगाव तालुक्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहेत.
दि.१७ मे ला वणी बसस्थानका समोरील माधव मेडीकल चे संचालक मनिष निमेकर यांच्याकडे एक सयंत्र ठेवण्यात आले असुन ऑक्सिजन ची आवश्यकता असलेल्या गरजुंनी मनिष निमेकर यांच्या ९४२२१६६०९४ या मोबाईल नंबर संपर्क साधावा असे आवाहन आमदार बोदकुरवार यांनी केले आहे. तर एक ऑक्सिजन सयंत्र कायर येथिल आरोग्य केंद्राकरीता देण्यात आले असुन, आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी येथिल आरोग्य अधिकारी डॉ. शेन्डे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आले आहे. यावेळी वणी पंचायत समिती चे सभापती संजय पिंपळशेंडे, जि.प.सदस्या सौ. मंगलाताई पावडे,कायरचे सरपंच नितीन दखने,गटविकास अधिकारी राजेश गायनर यांचेसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य केंद्राची संपुर्ण पाहणी करून विविध उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार बोदकुरवार यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

*वणी ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट चे साहित्य दाखल*

माणसाचे आयुष्य हे श्वासात मोजले जाते,माणुस जन्माला आला की पहिला श्वास घेतो आणि मरतांना सेवटचा श्वास सोडतो.दोन श्वासातील अंतर म्हणजे आयुष्य,असं साध गणीत कोरोनाने अधिकच गंभिर आणि किचकट बनविले. येरव्ही कधी विचार देखिल न केलेल्या श्वासासाठी वनवन सुरु झाली. ऑक्सिजन साठी देशभर हाहाकार सुरु झाला. ही अडचन लक्षात घेता, वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी वणीतील कोविड रुग्णांची ऑक्सिजन अभावी हेळसांड होऊ नये याकरिता येथिल ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट व्हावा यासाठी पाठपूरावा केला. तर ऑक्सिजन ची कमतरता भासु देणार नाही असा शब्द जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला होता. त्यानुषंगाने सोमवारी दि.१७ मे रोजी ऑक्सिजन प्लांट चे साहित्य ग्रामिण रुग्णालय वणी येथे धडकले असुन १५ दिवसात प्लांट सुरु होऊन रुग्णांना प्राणवायू मिळणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.