तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान

89

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

अकोट शहरासह ग्रामीण भागात आज अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली,
४:३० वाजल्यापासून शहरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली,
जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसडली आहेत, तसेच वाऱ्यामुळे काहीवेळ शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता,
पावसाचा जोर अधिक असल्याने अकोट शहरासह परिसरातील अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता, अकोट शहरासह पण आज रुईखेड बांबर्डा या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी, भुईमूग ,लिंबू या पिकांना सर्वाधिक फटका बसलेला आहे,
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील बांबर्डा येतील शेतकरी मधुकर खंडारे याच्या राहत्या घरावरील पत्रे आणि संपूर्ण छत उडून गेल्याने या शेतमजुराचे कुटुंब उघड्यावर वर आले आहे.
तसेच तालुक्यातील ग्राम पणज सह बोचरा, शहापुर, वाघोडा, गौरखेड,नरसिंगपूर, या भागात रविवार दिनांक १६ मे ला सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या च्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱा व अवकाळी पावसाच्या धुमाकुळाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे,
यामध्ये केळी,कांदा,लिंबू, भुईमूंग, पिंपरी, टरबुज,संत्रा या महत्त्वाच्या पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे.
रिमझिम पावसाच्या धुमाकुळा मुळे शेतकऱ्यांना कांदा व केळी या पिकांची चिंता लागली होती आधीच लाखो रुपये खर्च करून आपला जिव धोक्यात घालून शेतकरी वर्ग पिक उगवतो,
मात्र आज या वादळी वाऱा व अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज अश्रू आले आहे,
आधीच अनेक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर पुन्हा एकदा नवे संकट उभे झाल्याने,
शेतकरी शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहे.

या परिसरातील केळीची झाडे जमीनदोस्त झाले या मुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे,
या नुकसान झालेल्या परीसराचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पणज सह बोचरा परीसरातील शेतकरी यांच्या कडून होत आहे.
या भागात शेतीसह लोकवस्ती असलेल्या भागात अनेक घरावरील टिन पत्रे उडाली असून गावात काही काळ गावातील विधुत पुरवठा ही खंडीत झाला होता,
काढणीसाठी आलेल्या या फळपिकांना हा पाऊस नुकसानदायक मानला जात आहे, गेल्या महिनाभरात जिल्ह्याला सातत्याने अवकाळी पाऊस व वादळाचा फटका बसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे,
आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा पणज सह बोचरा ग्रामस्थांना आहे.