विद्या मंदिर कोराडी -उज्वल यशाची परंपरा जपणारे विद्यालय

523

 

सुनील उत्तमराव साळवे(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर:31 जुलै 2020
श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित विद्यामंदिर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कोराडी या शाळेने नेहमी प्रमाणे राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावी व दहावी च्या परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.
उच्चमाध्यमिक म्हणजेच बारावीचा शाळेचा निकाल 95.09% असून विज्ञान शाखेचा 98.73% या मध्ये तरंग मेंढे (91.00%), हिमांशी खाडे (86.50%) व विलास पटले (85.00%) हे अव्वल ठरले. वाणिज्य शाखेचा निकाल 89.49% असून त्यामध्ये कल्याणी येवले (77.69%), मयूरी मानवटकर (71.09%) व वैष्णवी मुतणेवार (68.30%) वाणिज्य शाखेतून अव्वल ठरले. कलाशाखेचा निकाल 96.61% असून विजय राऊत (86.76%) शाळा तसेच कामठी तालुक्यातुन कला शाखेतून प्रथम आला.
हीच यशाची परंपरा कायम ठेवत माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीच्या विदयार्थ्यांनी सुद्धा चांगले यश संपादन केले. यात प्राविण्य श्रेणी मध्ये 35, अ श्रेणी मध्ये 74, ब श्रेणी मध्ये 32 व पास श्रेणी मध्ये 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून सार्थक देशमुख (90.00%), रुचिका वानखेडे (80.20%), तृप्ती गौतम (88.00%), आचल शेंडे (86.60%),ईशा लारोकर (86.20%), ऐश्वर्या चौधरी (85.80%), विजेता ठाकूर (85.60%), हिमानी इंगोले (84.80%), रिषिका वहाने (84.60%) यांनी चांगले गुण संपादन करून शाळेच्या नावलौकिकात मनाचा तुरा रोविला.
शाळेच्या व विदयार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती चे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन देशमुख, संस्था उपाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष माननीय नरेशचंद्र ठाकरे तसेच शाळा समिती सदस्य माननीय हेमंत काळमेघ, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी यशस्वी विद्यार्थी यांचे विशेष कौतुक केले. या यशात सहभागी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.