आॅनलाईन राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा संपन्न

42

 

महाराष्ट्र राज्य वुशू संघटनेच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा वुशू असोसिएशनच्या वतीने आयोजन
राज्यस्तरीय ट्रॅडिशनल वुशू स्पर्धा नुकतीच पार पडली
य स्पर्धेत अर्जुन देशपांडे, स्वयम कटके, तृप्ती चांदवडकर यांनी आपापल्या गटातून प्रथम क्रमांक पटकाविला.
सबज्युनियर गटात सिंगल लाँग वेपन इव्हेंटमध्ये पुण्याच्या अर्जुन देशपांडेने प्रथम तर मुबंईच्या आर्यन रेवाणकरने द्वितीय क्रमांक पटकाविला. ज्युनियर गटात पुण्याच्या स्वयम कटकेने प्रथम,स्वराज कोकाटेने द्वितीय तर मुंबईच्या रोनित सिनकरन तृतीय क्रमांक पटकाविला. सिनियर गटात पुण्याच्या तृप्ती चांदवडकर आणि खुशी तेलकर पहिल्या आणि दुसºया स्थानावर राहिले. ताईजीजॅन इव्हेंटमध्ये पुण्याच्या श्रावणी कटके हिने प्रथम, मिताली वाणी हिने द्वितीय तर कल्याणी जोशी आणि तृप्ती चांदवडकर यांना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला.
सीनियर गटामध्ये पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक औरंगाबाद जिल्हा आणि तृतीय क्रमांक कोल्हापूर जिल्ह्याने पटकावला. ज्युनियर गटामध्ये पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक मुंबईने द्वितीय क्रमांक तर तिसरा क्रमांक वर्धा जिल्ह्याने पटकाविला. सब ज्युनिअर गटामध्ये पुणे जिल्हा प्रथम मुंबई शहर द्वितीय तर वर्धा जिल्हा तृतीय स्थानी राहिला.
राष्ट्रीय आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेतून आशियाई आॅनलाईन ट्रॅडिशनल वुशू स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाणार असल्याने राज्यस्तरीय वुशू स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे. सदर स्पर्धेत संदीप शेलार, निलेश वाळींबे, गजानन पवार, प्रतिक्षा शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

*स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत – सबज्युनियर – सिंगल लाँग वेपन इव्हेंट – अर्जुन देशपांडे, पुणे (प्रथम),आर्यन रेवाणकर, मुंबई (द्वितीय).

ज्युनियर – सिंगल लाँग वेपन इव्हेंट – स्वयम कटके, पुणे (प्रथम), स्वराज कोकाटे, पुणे (द्वितीय), रोनित सिनकर,मुंबई (तृतीय).

सिनियर – सिंगल लाँग वेपन इव्हेंट-तृप्ती चांदवडकर, पुणे (प्रथम), खुशी तेलकर, पुणे (द्वितीय). सर्व पुणे.

ताईजीजॅन – श्रावणी कटके (प्रथम),मिताली वाणी (द्वितीय), कल्याणी जोशी आणि तृप्ती चांदवडकर (तृतीय)