Home शैक्षणिक पंढरीबापू देशमुख विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी/महागांव येथे गुणवंत...

पंढरीबापू देशमुख विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी/महागांव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

187

 

राहुल उके
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

महागांव (दि 31 जुलै)- महागाव येथील पंढरीबापू देशमुख विद्यालय तथा कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 31/ 7/ 2020 रोज शुक्रवारला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यात गुणानुक्रमे
प्रथम क्रमांक कु आदिती विनोद रामटेके ही 91.20 टक्के गुण घेऊन प्रथम आणि
द्वितीय क्रमांक कु. फाल्गुणि गायकवाड 88.20 टक्के व
तृतीय क्रमांक कु. वैष्णवी विनोद गहाणे हिला 87 टक्के प्राप्त झाले तसेच
चतुर्थ क्रमांक निखिल रुखमोडे 86 टक्के
पाचवा क्रमांक करण आकरे 85.20 टक्के कुणाल कापगते 83.60 टक्के साहिल मेश्राम 83.60 टक्के , कु. स्नेहल लाडे 82.60 टक्के , पंकज राऊत 82 टक्के, कु. सलोनी ठाकरे 81टक्के गुण घेऊन सुयश प्राप्त केले.
संस्थेच्या वतीने एस एस सी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन संस्था व प्राचार्य तसेच विषय शिक्षक यांच्याकडून व इतर सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य मा. श्री. वाय. एस. परशुरामकर सर प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. माणकर मँडम तसेच संस्थेचे पर्यवेक्षक मा. श्री. जे. के. काळसर्पे सर तसेच मा. श्री. डी. ए. मस्के सर तसेच शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात मा. श्री. वाय. एस. परशुरामकर सर यांनी विद्यार्थ्यांनां भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहून आपला व आपल्या शाळेचे नाव लवकिक करावे व देशाचासुजाण नागरिक बनून राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावावा असा मौलिक संदेश दिला प्रमुख पाहुण्यांचे समुचित भाषणे झालीत.
यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संचालन श्री. जे. के. काळसर्पे सर तर प्रास्ताविक श्री. डी. ए. मस्के सर यांनी केले.

Previous articleआ. सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्य अंध, अपंग व्यक्तीना आर. ओ फिल्टर वाटप सरपंच पारस पिंपळकर यांच्या पुढाकारातून सेवादीवसाचे आयोजन
Next articleविद्या मंदिर कोराडी -उज्वल यशाची परंपरा जपणारे विद्यालय