देसाईगंज पोलिसांच्या कारवाईत 22400 रुपयांचा दारू साठा जप्त

177

 

ऋषी सहारे
संपादक

स्थानिक पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकत दारूसह एकूण 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी सहा जणांवर देसाईगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाईगंज शहरातील भगतसिंग वार्डातील प्रशांत सूर्यनारायण पवार 40 या आरोपीकडून तीन हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली असून आरोपी अशपाक जमील शेख 50 राहणार किद्वाई वार्ड देसाईगंज याचा शोध सुरू आहे. दुसरी कारवाई आंबेडकर वार्ड करीत 2 हजार 600 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी अनिरुद्ध विलास डांगे 31 या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विजय वसंत पानसे 26 राहणार आंबेडकर वार्ड या आरोपीकडून दोन हजार पाचशे रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. चौथी कारवाई हातभट्टी दारू विक्रेता विरोधात करण्यात आली. आरोपी नरेंद्र रामचंद्र दराडे राहणार भगतसिंग देसाईगंज यांच्या ताब्यातून दहा लिटर मोह फुलाची दारू जप्त करण्यात आली. शहरातील आंबेडकर वार्ड येथील अनील वसंत पानसे सव्वीस यांच्याकडून आठ हजार रुपयांची देशी दारू 3200 रुपयांची बीअर असा एकूण अकरा हजार 300 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. असा पाचही गुन्ह्यातील एकूण 22400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.