आरमोरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

0
89

 

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

आरमोरी:- आरमोरीत रक्तदान शिबीर , प्रतीक रामटेके, सारंग जांभुळे यांच्या पुढाकाराने
आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले .त्यात युंवकांचा उत्स्फ्रूर्त प्रतिसाद देत आपले सामाजिक दायित्व निभावले.
कोरोना ची लस घेतल्या नंतर महिना भर रक्तदान करता येत नाही .त्यामुळे युवकांनी लस घेण्या पूर्वी रक्तदान केले. “एक हात मदतीचा”, या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदाते , प्रकल्प रामटेके , अक्षय सोरते ,सुमित महाजन , रोहित भुते , हर्षल रामटेके , मयूर भानारकर , तुषार रामटेके , अतुल चोपकर , प्रशिक इंदूरकर , सुमित बनकर , मनीष डोंगरे , प्रशिक रामटेके , प्रफुल कुकडकार , आदींचा समावेश होता. प्रतिक ऋषी रामटेके, सारंग नरेंद्र जांभुळे आणि प्रीतम धोंडने यांच्या पुढाकाराने व वैद्यकीय अधिकारी डॉ. उईके मॅडम, डॉ.अभिजित मारभते सर आणि डॉ. प्रियंका धात्रक यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने हे शिबीर पार पडले. जिल्हा रक्तपेढी चे सर्व कर्मचारी सदर शिबिराला उपस्थित होते.