बल्लारपूर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केंद्र सरकार द्वारा खतांची किंमत वाढवल्या बद्दल आंदोलन

120

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : एकीकडे पेट्रोलच्या किंमती शंभरच्या वर गेल्या असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे,

भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेले आहेत. केंद्र सरकारने आज सामान्यांना दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढवण्याचे काम भारत सरकारने केले आहे. 10.26.26 ची किंमती 600 रुपयांनी वाढली आहे. डीएपीची किंमत जवळपास 715 रुपयांनी वाढली आहे. जो डीएपी 1185 रुपयाला होता, तो आता 1900 रुपयांना मिळणार आहे. 10.26.26 चे पन्नास किलोचे पोते 1175 रुपयांचे होते तेच आता 1775 रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमतीही वाढवल्या आहेत. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा एक मोठे संकट निर्माण झालं आहे.बल्लारपूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे खतांच्या दरवाढीचा निषेध म्हणून याविरोधात बल्लारपूर तहसीलदार मार्फेत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले या आंदोलनात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हा अध्यक्ष सौ.बेबीताई उईके,बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, बल्लारपूर कार्यकारी अध्यक्ष राकेश सोमानी, उपाध्यक्ष आरिफ शेख, भुरूभाई बक्ष, देवा यादव, संजय गांधी निराधार योजना सदस्य सुमित डोहणे, शहर महासचिव नितीन सोयाम ,अंकीत निवलकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.