Home चंद्रपूर  आ. सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्य अंध, अपंग व्यक्तीना आर. ओ फिल्टर वाटप सरपंच...

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्य अंध, अपंग व्यक्तीना आर. ओ फिल्टर वाटप सरपंच पारस पिंपळकर यांच्या पुढाकारातून सेवादीवसाचे आयोजन

165

प्रशांत चरड़े,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि,
माजी पालकमंत्री आमदार विकासपुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवस सेवादिवस म्हणून साजरा केला जात आहे. या वाढदिवसाच्या निमित्य गावातील अंध व अपंग व्यक्तीना आर. ओ.  फिल्टर मशीन वाटप करण्यात आले.

चंद्रपूर तालुक्यातील पिपरी ग्राम पंचायत येथील १४ व वित्त अयोग निधीतून आर. ओ.  फिल्टर मशीन खरेदी करण्यात आल्या. महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी यांच्या हस्ते मशीन वितरित करण्यात आल्या. या कार्यक्रमांला  सरपंच पारस पिंपळकर, उपसरपंच राकेश पिंपळकर, सदस्य अतुलजी मोहितकर, सदस्य अनिता जुनारकर, सदस्य देविदास येरगुडे, एस. मुनगंटीवार, रंगरावजी पवार, यांची उपस्थिती होती.

सुधीरभाऊनी या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठलीही कसर सोडली नाही. वन अकादमी, सैनिक शाळा, महानगरपालिकेची सुसज्ज इमारत, जिल्हा परिषदेचे नूतनीकरण, नियोजन भवन, आदर्श असे बसस्थानक अशी अनेक कामे भाऊंच्या प्रयत्नामुळेच होऊ शकले., जिल्ह्यांतील प्रत्येल तालुक्याला त्यांनी विकासासाठी भरपूर निधी दिला. सुधीरभाऊंच्या दूरदृष्टीने हे शक्य होऊ शकले. असे मत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती नितु चौधरी यांनी व्यक्त केले.

Previous articleआमगांव मध्ये एक दिवसीय जनता कफ्यू… व्यापारी संघ कडुन बंद ला प्रतिसाद.. नगरपरिषद प्रशासक डि.एस भोयर यांच्या मार्गदर्शनात कडकडीत बंद..
Next articleपंढरीबापू देशमुख विद्यालय व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येरंडी/महागांव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार