कुरुड ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी बेघर झालेल्या कुटुंबाला केली आर्थिक मदत

348

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
देसाईगंज तालुक्यातील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड येथील अचानकपणे न कळत घराला आग लागून घर व घरातील सर्व साहित्य जळून खाक झालेल्या कुटुंबाला कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा प्रशाला अविनाश गेडाम,उपसरपंच क्षितिज उके यांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली.
कुरुड येथील कांबळी मोहल्ल्यातील अंताराम कांबळी यांच्या घराला १५ मे रोजी रात्रो १०.३० च्या सुमारास अचानकपणे न कळत आग लागल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम जळून खाक झाले होते.आग विझविण्यासाठी गावातील नागरीकांनी जीव पणाला लावले होते.मात्र घराला लागलेली आग इतकी भयानक होती की अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले.अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणल्या गेली.तोपर्यंत घर व घरातील सर्व साहित्ये जळून खाक झाल्याने कांबळी परिवारातील सदस्यांवर आभाळ कोसळल्या सारखे झाले.अशातच आर्थिक परिस्थिती नाजूक स्वरूपाची असल्याने जळालेल्या घरा शेजारीच झोपडी तयार करून कांबळी परिवार वास्तव्य करू लागले.आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याची बाब कुरुड ग्रामपंचायतीच्या सरपंचा व उपसरपंच यांच्या लक्षात येताच कांबळी परिवारास स्वतः वैयक्तिकरित्या एक हात मदतीचा या उद्देशाने आर्थिक मदत केली व शासन स्तरावरून मिळणाऱ्या मदतीसाठी व घरकुलाचे लाभ देण्याकरिता प्राधान्यक्रम देऊ अशी ग्वाही देण्यात आली.
आर्थिक मदत करतेवेळी सरपंचा प्रशाला गेडाम,उपसरपंच क्षितिज उके,ग्रामपंचायत सदस्य व माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,ग्रामपंचायत सदस्य विलास पिलारे,शंकर पारधी,सामाजीक कार्यकर्ते विजय कुंभलवार,शालीक मिसार,भाष्कर वाटकर राजेश्वर कांबळी प्रामुख्याने उपस्थित होते.