घुग्घूस ग्रामपंचायत प्रशासक पदी ज्येष्ठ पत्रकार श्री.शामराव बोबडे यांची नियुक्ती करा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे यांची मागणी

0
144

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस येथील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता शामराव बोबडे यांची घुग्घुस ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जेष्ठ पत्रकार शामराव बोबडे यांना नेहमीच समाज कार्याची आवड आहे मनमिळावु स्वभावाचे असल्याने सर्वांना त्यांच्या प्रती आदरभाव आहे. गावातील प्रत्येक समस्या सोडविण्यात ते अग्रेसर असतात. घुग्घुस नगरपरिषदेच्या मागणीचा पाठपुरवा त्यांनी न्यायालयीन मार्गाने केला आहे. त्यामुळे आगमी होणा-या ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदावर जेष्ठ पत्रकार शामराव बोबडे यांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश शेंडे, अजय जोगी , प्रभाकर चिकनकर , महेश शेंडे, चेतन बोबडे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.