भाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे

0
44

नंददत्त डेकाटे प्रतिनिधी नागपूर

नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी शिक्षण विभागाव्दारे वितरित करण्यात सायकलीचा लाभ आपल्याच सर्कल मधील विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप भाजपाच्या सदस्यांनी केला आहे नागपूर पंचायत समिती अंतर्गत ९७ सायकलींसाठी लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. यातील ८९ लाभार्थी सोनेगाव – निपाणी सर्कलचे आहेत. सभापतींनी आमच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेस च्या सदस्यांनाही ठेंगा दाखवण्याचा आरोप त्यांनी केला आहे जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२० ते २०२१ अंतर्गत वर्ग ५ते १२ च्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात येते त्या अंतर्गत नागपूर पंचायत समिती मधील ९७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यात ४८ विद्यार्थीनीना व ४९ विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सोनेगाव निपाणी सर्कल मधील असल्याचा आरोप भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी केला आहे. मार्च महिन्यात या लाभार्थ्यांची निवड झाली. निवड यादी चा हवाला देत गुजरकर म्हणाले की ४८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४ विद्यार्थीनीपैकी व ४ विद्यार्थी वेगळ्या सर्कलचे आहेत. विद्यार्थ्यांना डीपीटीच्या माध्यमातून सायकलीचे वितरण येणार आहे. सेस फंड च्या योजनेसाठी सर्वच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविले होते परंतु सभापतींनी लाभार्थ्यांची निवड करताना इतर सदस्यांना ठेंगा दाखविला. “सर्व सदस्यांना समप्रमाणात सायकलीचे वाटप करायचे होते. सभापती म्हणून पाच ते दहा सायकली त्यांनी जास्त ठेवल्या असत्या तर हरकत नव्हती पण सर्वच सायकली आपल्याच सर्कलमध्ये वठवूण घेण्याचा प्रकार इतर सदस्यांना डावलण्याचा आहे. जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे पदाधिकाऱ्यांना मनमानी सुरू केली असून हे खपवून घेतले जाणार नाही सुभाष गुजरकर जिल्हा परिषद सदस्य