रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्येबाबत नेटकरी आक्रमक.. आमदार उदय सामंत यांच्या वचनाचीही करून देत आहेत आठवण.

486

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील देखील रस्त्यांच्या कामांना अनेक वर्षे ‘खो’ बसलेला दिसून येत आहे. अनेक भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चांगल्या रस्त्यांची अपेक्षा रत्नागिरीकरांना गेली अनेक वर्ष आहे रस्ते डांबरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल व पावसापूर्वी ते पूर्ण देखील होईल असे आश्वासन अनेक लहान मोठ्या राजकीय नेत्यांनी दिली होती मात्र अद्यापही रस्त्यांची कामे सुरू झालेली दिसून येत नाहीत. याचे पडसाद आता रत्नागिरीकर व्हाट्सअप, फेसबूक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करताना दिसत आहे.
आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी शहराची रस्त्यांची दयनीय परिस्थिती ही शहर नळपाणी योजनेच्या खोदकामामुळे झालेली रस्त्यांची अवस्था, अपघातांना मिळत असलेले आमंत्रण, नागरिकांना होत असलेला त्रास मान्य करत 15 मे पूर्वी शहरातील रस्ते चकाचक करणार असल्याचे वचन दिले होते मात्र त्याची पूर्तता झालेली दिसून आली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक याबाबत देखील नाराजी व्यक्त करीत आहेत शहरात डांबरीकरणाचे काम चालू आहे असे सांगितले जाते मात्र तसे दिसत नाही काम चालू असल्यास त्याचे फोटो पाठवा, रस्त्यांचे काम करण्यासाठी पावसाची वाट पाहत आहेत का?, रस्ते गुळगुळीत करणार की बुळबुळीत?, रस्त्यांचे डांबरीकरण ऐवजी चुकून डोंगरीकरण केले की काय? धुळधुळीत चे चुकून गुळगुळीत म्हंटले की काय? रस्ते गुळगुळीत होतील की नाही माहित नाही मात्र आमच्या गाड्यांचे टायर मात्र गुळगुळीत झाले आहेत. अशा शब्दात नेट करी आपला संताप व्यक्त करीत आहेत आतातरी प्रशासन याबाबत भूमिका घेईल आणि रत्नागिरीकरांना चांगले रस्ते मिळतील अशी अपेक्षा रत्नागिरीकर व्यक्त करीत आहेत.

*दखल न्यूज भारत*