उपजिल्हा रुग्णालय मुखेडचा बेवारस कारभार… कोरोना लस देताय की लोकांच्या जिवाशी खेळताय..?? -तुफान गर्दी १५ दिवसांपासून लोक लस घेण्यासाठी प्रतिक्षेत -कोरोनाचे नियम धाब्यावर – प्रशासनाकडून कुठलीही काळजी नाही

188

 

राजेश बा नाईक..,,
डिस्ट्रिक्ट करसपॉडन्ट, नांदेड
दखल न्यूज // दखल न्यूज भारत

मुखेड :- संपूर्ण देशात कोरोनाने आहाकार माजला आसुन सद्या परिस्थितीत अजूनही संकटाचा सामना करीत आहे. आशा परिस्थिती लोकांनी तुफान गर्दी करीत आहेत व कोरोनाचे नियम धाब्यावर बसवीत आहेत. प्रशासनाने कोणतीच यावर व्यवस्था केलेली नाही.

यातच उपजिल्हा रुग्णालय मुखेड मध्ये शासकीय कर्मचारी, शिक्षक, व फ्रटलाईन सेवेतील कर्मचारी यांना देखील ८/८ दिवस कोरोना ची दुसरी लस घेण्यासाठी दररोज फेरे मारण्याची गरज भासत आहे. शासकीय सेवेतील कर्मचारी नागरिकांशी व शासकीय सेवेतील लोकांशी बोलताना मैन रुप धारण करुन बसलेले आहेत. यातच दररोज कामधंदे सोडून लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. रांगा लावूनही कोरोना लस वेळेत मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी विचार केली असता कुठल्याही प्रकारे त्याना कर्मचारी कडून उत्तर दिले जात नाही.
यातच दररोज १००/२०० लोक येथे लस घेण्यासाठी येत आहेत. यातच प्रचंड प्रमाणात गर्दी होत आसुन प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

हि परिस्थिती आशिच राहिल्यास कोरोना हा मोठ्या प्रमाणात वाढणार मग याला जबाबदार कोण आसा प्रश्न उपस्थित होत आहे..