संतापजनक! ऑक्सिजन सिलेंडरसाठी शेजाऱ्याने केली सेक्सची मागणी

516

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

दिल्ली :- लस, ऑक्सिजन याच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागत आहे. अशातच दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाने ऑक्सिजन सिलेंडर देण्याच्या मोबदल्यात एका तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

कोरोनाचे गंभीर संकंट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. अशावेळी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच एका तरुणीचे ट्वीट सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहे. एका तरुणीने ट्विटरवर माहिती दिली की, तिच्या मित्राच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची तब्येत खालावली होती. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. अशावेळी मित्राची बहिणीने शेजारी राहत असलेल्या एकाला ऑक्सिजन सिलेंडरची गरज असल्याचे सांगितले. मात्र त्या व्यक्तीने ऑक्सिजन सिलेंडरच्या मोबदल्यात तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

तरुणीने केलेल्या ट्विट वाचून युजर्समध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. युजर्संनी पीडितेला त्या नराधमाविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. काहींनी तिच्या परिसरातील आरडब्ल्यूएला तक्रार करण्यास सांगितले. तर काहींनी संशयिताचे नावही जाहीर केले. मात्र आरोपीने हे सगळे आरोप फेटाळले आहेत. शिवाय याप्रकरणात पूर्ण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले आहे.