प्रा.आरोग्य उपकेंद्र नकोडा येथे मा. श्री अनिलजी गुप्ता (प्लांन्ट हेड ए.सी.सी)सह 200 व्यक्तीचे लसीकरण लसीकरण करीता आकर्षक ठरतंय ‘नकोडा आरोग्य उपकेंद्र’

120

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,
दि.16 मे रोजी नकोडा येथे आरोग्य उपकेंद्रात अनिल गुप्ता यांनी लस घेण्यास नोंदणी केली व कोविड लस घेतली. सद्या नकोडा उपकेंद्र नागरिकांन करीता आकर्षणाचा विषय ठरत आहे. या केंद्रावर डॉ. कोल्हे, डॉ. दास, विनय बोढे, गजानन साखरकर, राजेंद्र गांधी सर, पुष्कर चौधरी अश्या अनेक व्यक्तींनी लसीकरण केंद्रावर भेट देऊन लसिकरनाचा लाभ घेतला. ब्रिजभूषन पाझारे यांनी नेहमी ‘अतिथी देवो भव’ याअनुसार केंद्रावर येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला अतिथी आहे त्यामुळे त्यांची काळजी घेणे व त्यांच्या सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याबाबत नेहमीच बोलतात. त्याअनुषंगाने येथिल सरपंच किरण बांदूरकर व उपसरपंच मंगेश राजगडकर यांनी येणाऱ्या व्यक्तीनं करीता उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. त्यामुळे हे अतिशय आकर्षक लसीकरण केंद्र ठरत आहे.

लसीकरण केंद्रावर आज 200 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला . लसीकरण केंद्रावर उपस्थित मा.श्री ब्रिजभूषन पाझारे माजी समाज कल्याण सभापती व विद्यमान सदस्य जि.प चंद्रपुर , डॉ. परमेश्वर वाकडकर यांची उपस्थिती होती.
उपकेंद्रात सुरू झालेल्या लसीकरणामुळे गावातील प्रत्येक नागरिकांना कोविड ची प्रथम व द्वितीय लस घेण्यास सोयीस्कर झाले.
यावेळी उपस्थित पं. स सदस्य सविताताई कोवे, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्राप सदस्य-अर्चना पाझारे , तनुश्री बांदूरकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रीतसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली,कंपा राजय्या,कांचन ताई वाकडे तसेच प्रा. आ.कर्मचारी वर्ग उपस्थित होते.