घुग्घुस परिसरात डॉ परमेश्वर वाकदकर यांच्या नेतृत्वात होत आहे वेगाने लसीकरण

150

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

दिनाक 16 / 5 / 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र घुगुस चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्र्वर वाकदकर यांचा मार्गदर्शन खाली चार टीम बनवून 1) राजीव रतन हॉस्पिटल ,घुगुस 2) उपकेंद्र ग्रामपंचायत नकोडा 3) उपकेंद्र , ग्राम पंचायत पांढरकवडा. व, 4) पिपरी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे घुगुस अंतर्गत येणाऱ्या घुगुस , मातारदेवी, बेल्सनी, नकोडा , ऊसेगाव, शेनगाव, पांढरकवडा, वढा, अंतूर्ला, धानोरा, पिपरी, मार्डा, सिधुर, महाकुर्ला, नागाला या गावातील 45 वर्ष वरिल ऐकुन 760 नागरिकाचे covid 19 चे लसीकरण करण्यात आले.
या कामी ऐकुन 4 टीम ने काम केले. डॉ. अश्विनी कोडपे, डॉ. प्रिया पोले, डॉ. सिद्दिक, डॉ. प्रतिमा तिवारी आरोग्य सहायक , कावळे, झाडे , श्रीमंती पाटील. व आरोग्य सेवक पराते, बेले, गणवीर, मोरे, कानेटकर, बावणे, श्रीमंती पाटील सिस्टर, वाकुलकर सिस्टर, लांडगे सिस्टर, कांबळे सिस्टर यांचा सहकार्य नी लासीकरण करण्यात आले.. नविन नियमानुसार लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडे नी लावण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आवाहन करण्यात येते की, विनाकारण केंद्रावर गर्दी करु नये.. दिवस पूर्ण झाल्या नंतरच सेकंड डोस घण्यासाठी यावे. सर्व केंद्रावर टोकन सिस्टीम असल्यामुळे जे प्रथम येणारं , त्यांना प्रथम लस देण्यात येणार आहे. टोकन नंबर नुसार लस देण्यात येणारं येईल. पुढील काही दिवसात सर्वांना लस ऊपलब्ध होणारं असून नकोडा व राजीव रतन हॉस्पिटल घुगूस या ठिकाणी दिनाक 17 / 5/21 ला पण 400 डोस लस ऊपलब्ध रहाणार आहे. असे आवाहन डॉ. वाकदकर परमेश्र्वर मुख्य मेडिकल ऑफिसर घुगुस यांनी केले आहे.