आयुर्वेदिक उपचारक भजनराव मोहूर्ले यांचे निधन

265

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची :-
येथिल आयुर्वेदिक औषधी वैद्यकिय क्षेञासह सामाजिक धार्मिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते राजकिय क्षेञात आपल्या कर्तुत्व शैलिने असाधारण नावलौकिक पावलेले भजनराव मोहूरले यांचे दि १३ ला गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोणा उपचारा दरम्यान निधन झाले.
भजनराव मोहूरले यांच्या ६० वर्षाच्या जिवनप्रवासात त्यांनी गोरगरिब जनतेची निःस्वार्थपणे सेवा केली. राञी अपराञी येणार्या रुग्णांना कधिच निराश केले नाही. रुग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा म्हनुण त्यांनी आपले आयुर्वेदिक वैद्यकिय व्रत अंगिकारले होते. त्यांच्या उपचारशैलित नेहमिच धार्मिकतेचे दर्शन घडत होते. त्यांनी पाच वर्षाच्या कालावधित कोरची ग्रामपंचायत सदस्य भुषविले होते. त्या कालावधित त्यांनी कोरची शहरात विविध विकासकामांचाओघ आणल होता. सर्वांचे मंगल होवो अशी अंतरमनी भावना जोपासनारे भजनराव यांच्या अकाली मृत्यू तालुक्यात शोककळा पसरली आहे. भजनराव यांच्या अकाली निधनाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची खूप मोठी पोकळी निर्माण झाली असी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रताबसिंग गजभिये यांनी व्यक्त केली. जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी दुःख व्यक्त केले आहे. भजनराव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी दोन लाहान भाऊ व परिसरातिल बहुसंख्य चाहता वर्ग असुन त्यांचे निधनामुळे सर्वञ शोककळा पसरली आहे.