आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूरकर जनतेच्‍या सेवेत आणखी एक रूग्‍णवाहीका रूजु परस्‍परांच्‍या सहकार्याने कोरोना विरोधातील हा लढा निश्‍चीतपणे जिंकू – आ. सुधीर मुनगंटीवार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मानले श्री. लकी सलुजा यांचे आभार

72

 

दख़ल न्यूज़ भारत@शंकर महाकाली

बल्लारपुर : कोरोनाच्‍या लढाईत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, दानशूर व्‍यक्‍ती आपआपल्‍या परिने योगदान देत आहेत. संकट समयी योगदान देण्‍यात चंद्रपूर जिल्‍हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन विविध आरोग्‍य विषयक उपकरणे आम्‍ही उपलब्‍ध करून दिली आहेत. आज जिल्‍हयात रूग्‍ण्‍ावाहीकांची संख्‍या रूग्‍णसंख्‍येच्‍या तुलनेत कमी आहे. अशा परिस्‍थीतीत श्री. लकी सलुजा यांनी स्‍वतःहून पुढाकार घेत बल्‍लारपूरसाठी एक रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करून दिली आहे. समाजभान जोपासत समाजाप्रती आपली कर्तव्‍ये पार पाडणा-या अशा समाजसेवकांच्‍या सह‍कार्यानेच कोरोना विरोधातील हा लढा आपण जिंकू, असा विश्‍वास विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केला.

दिनांक १५ मे रोजी भारतीय जनता पार्टी बल्‍लारपूर शाखेला आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रूग्‍णवाहीकेची चावी सुपुर्द करत आणखी एक रूग्‍णवाहीका नागरिकांच्‍या सेवेत रूजु केली. यावेळी बल्‍लारपूरचे नगरध्‍यक्ष हरीश शर्मा, काशी सिंह, निलेश खरबडे, समीर केने, अजय दुबे, मनीष पांडे, राजू दारी, सतिश कनकम, सारिका कनकम, राजेश दासरवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. तसेच राजू अली हसन अली, प्रशांत कोलप्‍याकवार, विवेक ताटीवार, अशोक हासानी, सोनी यांची देखील उपस्थिती होती. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूरकर जनतेच्‍या वतीने लकी सलुजा यांचे आभार व्‍यक्‍त केले.

कालच चंद्रपूर शहर व तालुक्‍यातील नागरिकांसाठी आर्य वैश्‍य स्‍नेह मंडळाला आपण रूग्‍णवाहीका सुपुर्द केल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. तीन दिवसा आधीच बल्‍लारपूरसाठी आमदार निधीतुन आपण दोन रूग्‍णवाहीका उपलब्‍ध केल्‍याचे ते म्‍हणाले. रूग्‍णसेवा ही सर्वांची प्राथमिकता असली पाहीजे असेही ते म्‍हणाले.

याआधीही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हा रूग्‍णालयाला १५ एनआयव्‍ही, २ मिनी व्‍हेटीलेटर्स, १५ मोठे व्‍हेटीलेटर्स, चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर, पोंभुर्णा साठी ३० ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्‍ध