विकासासाठी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मा. ना. वडेट्टीवार यांच्याकडेच द्या- महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वासनिक यांची मागणी

132

हर्ष साखरे दखल न्युज भारत 9518913059

गडचिरोली जिल्ह्याचे तात्पुरते पालकमंत्री पद मा. ना. विजय वडेट्टीवार यांचेकडे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून देण्यात आलेले होते. आपल्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी लोकांची मने जिंकली असून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचेकडेच पूर्णवेळ पालकमंत्रीपद द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष मा. प्रफुल्ल वासनिक यांनी केलेली आहे.
पूर्णवेळ पालकमंत्रीपद महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या कोट्यातून वरिष्ठ नेते मा. ना. एकनाथ शिंदे यांचे कडे देण्यात आले आहे. त्यांची ओळख अत्यंत कर्तव्यनिष्ठ अशी असून त्यांचेबद्दल पूर्ण आदर आहे. त्यांचेकडे ठाणे जिल्ह्याचे पूर्णवेळ पालकमंत्री पद असून नगरविकास खाते व सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) असल्याने त्यांचा बराचसा वेळ हा मंत्रालयात जात असल्याने गडचिरोलीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना वारंवार येण्यास अडचण ठरू शकते.
मा. ना. विजय वडेट्टीवार हे गडचिरोली जवळील ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार असल्याने तसेच बऱ्याच वर्षांपासून त्यांचा गडचिरोली जिल्ह्याशी संबंध असल्याने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील समस्यांची चांगलीच जाणीव आहे. मागील तीन महिन्यांमध्ये त्यांनी गडचिरोली जिल्यातील अनेक समस्या सोडविल्या असून जिल्ह्याच्या विकासात फार मोठी मदत होणार आहे. तसेच त्यांचा जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर असून त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला उपयोग होऊ शकते. प्रशासनावरील वचक, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि “बोले तैसा चाले” अशी त्यांची ओळख आहे. जिल्ह्यात नक्षलवाद, बेरोजगार, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांच्या समस्या असून पायाभूत सुविधांसाठी त्यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून अनेकवेळा मदत निधी आणलेला आहे. विजय वडेट्टीवार यांचेकडे चंद्रपूर जिल्ह्याचे पूर्णवेळ पालकमंत्रीपद असून मदत व पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण खातेही आहे. दोन्ही जिल्ह्यांची सीमा एकमेकाला लागून असून त्यांनी मागील तीन महिन्यांमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचे विकास निधीसाठी कुठलाही दूजाभाव केलेला नाही. त्यांचे प्रशासनावरील लक्ष उत्तम असून महत्वाच्या निर्णयात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. तसेच वीज कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या असून ते सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी सर्वतोपरी मदत करू असे, आश्वासन त्यांनी दिलेले आहे. ना. एकनाथ शिंदे हेही उत्तम नेते असून त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. परंतु जिल्ह्यातील लोकांची पालकमंत्रीपद विजय वडेट्टीवार यांचेकडे असावी अशी इच्छा आहे. त्यामुळे पूर्णवेळ पालकमंत्रीपद ना. विजय वडेट्टीवार यांचेकडेच द्यावे, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. बाळासाहेब थोरात यांना पाठवणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मा. प्रफुल्ल वासनिक यांनी केली. यावेळी इम्रान कुरेशी, प्रविण बोरकर, हितेश नंदेश्वर, दिवाकर मोहूर्ले, मनोज पेदलवार, निखिल सहारे, ज्ञानेश्वर जांभुळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

प्रफुल्ल हरिदास वासनिक
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, गडचिरोली
मो. 9168922791