शिवसेना जिल्हाप्रमुखांची भामरागड तालुक्यातील संवेदनशील व अतिदुर्गम बिनागुंडा गावाला भेट व नागरिकांशी चर्चा.

158

 

सदाशिव माकडे (८२७५२२८०२०)

भामरागड :
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व गडचिरोली जिल्ह्या शिवसेना संपर्कप्रमुख किशोर पोतदार तसेच माजी आमदार तथा गडचिरोली जिल्ह्या शिवसेना सहसंपर्कप्रमुख रामकृष्णजी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२/०५/२०२१ रोजी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे गाव बिनागुंडा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती गडचिरोली राजगोपालजी सुल्वावार यांनी बिनागुंडा गावाला भेट घेऊन गावातील नागरिकांशी चर्चा करण्यात आली.
बिनागुंडा गावात पाण्याची उत्तम सोय नाही, गावात लाईट नाही, पक्के रस्ते नाही, उत्तम आरोग्य सेवा नाही यासह अनेक समस्या आहेत असे चर्चे दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुखांना बिनागुंडा येथील नागरिकांनी सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी गावातील नागरिकांना सांगितले की ह्या सर्व समस्या आम्ही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समोर मांडणार असून त्यांच्या निर्देशानूसार समस्यांचे निराकरण करु असे सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अहेरी (ग्रामीण) सुभाषजी घुटे, शिवसेना तालुका प्रमुख भामरागड खुशालजी मडावी, शिवसेना शहर प्रमुख नासीरजी शेख, वेंकटेश कंदीवार, महेंद्र सुल्वावार व गावातील नागरिक उपस्थित होते.