Home गडचिरोली युवारंग तर्फे नगरपरिषद ला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला

युवारंग तर्फे नगरपरिषद ला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला

168

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी
आरमोरी

दिनांक-३१/०७/२०२०

आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथील नागरिकांना नळाच्या पाण्यासाठी मागील बऱ्याच वर्षापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे सदर वार्डातील नळाची पाईपलाईन ही २ इंचची असून यामधून फक्त २० ते ३० मिनिट पाणी नळ ग्राहकांना मिळतो त्यातच एक दिवसा आड नळाचे पाणी सोडल्या जाते त्यामुळे ग्राहकांना मुबलक पाणी मिळत नाही.
२० नळ ग्राहकांना या समस्या चे नाहक त्रास सहन करवा लागत आहे व इतर ६ नळ ग्राहकासाठी पाण्याचे वॉल्व बसविन्यात आले हा वॉल्व त्वरित काढून पाइपलाइन पूर्वतत ठेवावे अशी वार्ड मधील नागरिकांची वारंवार मागील बऱ्याच वर्षापासून मागणी होत आहे.
याबाबत माननीय नगरसेवक व माननीय पाणीपुरवठा सभापती यांना वारंवार तक्रार व निवेदन देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे या गंभीर समस्येचे माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद आरमोरी यांनी लवकरात लवकर निराकरण करावे अन्यथा युवारंग तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल .

Previous articleवंचित बहुजन आघाडीचा 1 ऑगस्ट पासून होणाऱ्या लॉकडाउन ला विरोध…
Next articleविकासासाठी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मा. ना. वडेट्टीवार यांच्याकडेच द्या- महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वासनिक यांची मागणी