आमदार पुत्राच्या मारहानी नंतर मेडिकल असोसिएशनने केला निषेध

475

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी :- स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजीत मारबते यांच्यावर 12 मे रोजी झालेल्या हल्ल्याचा मेडिकल असोसिएशनने निषेध नोंदविला आहे तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर नर्सेस व आरोग्य कर्मचारी रुग्णांची सेवा करीत आहेत. लोकांचे प्राण वाचवित आहेत परंतु काही माथेफिरू डॉक्टरांवर ही हल्ले करीत आहेत. यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण होत आहे. याचा संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होईल डॉ. मारबते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध दर्शवित आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉ.कोपुलवार, डॉ. नाकाडे, डॉ. कुंभार, डॉ. मसराम, डॉ. रेखा पाल कटरे, डॉ. खोब्रागडे, डॉ. निमजे आदींनी केली आहे.