वंचित बहुजन आघाडीचा 1 ऑगस्ट पासून होणाऱ्या लॉकडाउन ला विरोध…

267

प्रेम गावंडे
साहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

भारतात कोरोना हा इथल्या शासनकरत्या लोकांनी आणला. देशाचे प्रधानमंत्री यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती भारतात बोलाउन आपल्या देशात त्यांच्या मार्फ़त कोरोना आणला अशी परिस्थिति आहे.
सम्पूर्ण देशात कोरोना च्या नावाखाली सर्वसमान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम शासन करत आहे. कोरोनामुळे मृत्यूची संख्या कमी तर बेरोजगारी, भुखमरी मुळे देशात मृत्यूची संख्या वाढत चाललेली आहे. मागील 4 महिन्यांपासून सर्वसमान्य जनतेला कोरोना ची भीती दाखवून वेठीस धरण्यात येत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीद्वारे आव्हान करतो की, सम्पूर्ण व्यापारी बंधू,किरकोळ दुकानदार,पान ठेला, रिक्शा, टैक्सी फुटपाथ वरील सर्व दुकानदार यानी आप आपली दुकाने सुरु करावी, तसेच आम्ही जंसमान्यन आव्हान करतो की, त्यानी खरेदीसाठी बाहेर पडावे. दी. 3 अगस्त ला रक्षाबंधनच कार्यक्रम असल्यामुले आम्ही शासनास विनंती करतो की, रक्षाबंधनसाठी सार्वजनिक परिवहन, शिवशाही, टैक्सी, सुरु कराव्यात. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळे या देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या न कोणत्या समुहचे कार्यक्रम असतात. सन समारंभ असतात अश्या वेळी भारतातील लोकांचा अंत पाहु नये. देशातील लोकांना आप आपले सन् समारंभ साजरे करण्याची मुभा द्यावी.
कोरोनाची धास्ति सर्व सामान्य जनतेने आता घेऊ नये. देशातील 130 कोटि जनता कोरोनाने बाधित झालेली नाही. कोरोनाने फक्त 15 टक्के लोक बाधित होऊन बरे होतात. तर 5 टक्के जनता ही अति जोखिमेत राहते. व उर्वरित फक्त 3 टक्के जनतेचा मृत्यु होत आहे. त्यात एक गोष्ट महत्वाची की देशाचा मृत्युदर कधीच 0 टक्के होत नसतो. त्यामुळे नागरिकाना कोरोना बाबत भीति बाळगू नये. देशात मोबाइल टीवी च्या माध्यमातून कोरोना हा किती भयंकर हे सांगून नागरिकना भयभीत करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे नागरिकनी या कोरोनाला न घाबरता आपन आपल्या घराच्या बाहेर निघावे. कोरोना होउ ननये यासाठी आपण तोंडाला रुमाल बांधावा व आपले जीवन पूर्ववत सुरु करावे. नाहीतर कोरोना ने मृत्यु न होता भुखमरी आणि बेरोजगारीने आपला मृत्यु होउ शकतो. या सोबत आम्ही सरकारला हे सुद्धा सांगू इछितो की, नागरिकनी कसे वागावे, काय खावे हे सरकारने ठरउ नये.
सरकारने लॉकडाऊन वाढविन्यापेक्षा कोरोनाचे संसर्ग थांबवण्यासाठी लस आनावी. राज्यातील आरोग्य यंत्रणा उभी करावी. दवाखान्यातील सुविधा वाढवाव्या.. कोरोना वर लॉक डाउन हा उपाय होउ शकत नाही. लोकडाउन मुळे छोटे उद्यागधंदे, छोटे व्यापारी उध्वस्त होत आहे. मंजूर वर्गवर उपासमारीची वेळ येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकर आहे..
वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेत मा. कुशलभाऊ मेश्राम, महासचिव महाराष्ट्र राज्य, राजुभाउ झोड़े, विदर्भ सदस्य, जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव, सुभाषचंद्र ढोलने, शहर महासचिव,राहुल चौधरी, सुभाष थोरात,बंडू ठेंगरे, सतीश खोब्रागडे, धीरज बाम्बोडे, अशोक पेरकवार, तेजराज भगत, इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.