लाॅकडाऊनच्या नावावर नागरिकांची मुस्कटदाबी नकोय..

292

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

नागरिक हे सर्वोतोपरी आहेत.त्यांच्या सुरक्षा संबंधात सर्व प्रकारची काळजी घेणे हे सरकारची नैतिक जबाबदारी आहे.देशात किंवा राज्यात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक नागरिकावर कोणत्याही प्रकारची आपत्ती येणार नाही याची दक्षता घेणे हे सरकारचे जबाबदेही कर्तव्य आहे.नागरिकांच्या सार्वभौमत्वाच्या स्वातंत्र्याला नाकारुन योग्य कार्य सरकारला काय पण कुणालाही करता येत नाही.म्हणूनच कोरोणा संसर्गजन्य आजाराला पुढे करून लाॅकडाऊनच्या नावावर नागरिकांची सर्व प्रकारची मुस्कटदाबी करणे योग्य नाही?यावर विश्लेषणात्मक विचार करण्याची गरज दिसते आहे.

डॉ.बिश्वरुप राय चौधरी यांच्या सह अनेक डाॅक्टरांच्या मते कोरोणा आजार हा संसर्गजन्य नसून सौम्य आहे व नेहमीचा आहे,तद्वतच या आजाराच्या नावावर जागतिक छडयंत्र सुरु आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.सर्दीपडसे,खोकला,ताप,हातपाय दुखने व गळ्यात दुखने,या प्रकारचे आजार देशातील नागरिक नित्याने अनुभवतात हे सत्य सर्वश्रुत आहे.परत्वे मास्क बांधणे मनुष्य मात्र्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असताना(प्राणवायू व कार्बनडाय ऑक्साइड च्या बाबतीत),एकाच बाजूचा विचार करून बळजबरीने मास्क बांधण्याची मनाई शासनाद्वारे केली जात आहे.

याचबरोबर टिबी,कॅन्सर,डेंग्यू मलेरिया,मलेरिया,विषमज्वर,काॅलरा,थायरॉईड,सिकलसेल,उच्चदाब-कमीदाब बिपी,किडणी,ह्रदयविकार,अल्शर,आतड्यांचे विकार,मनक्याचे विकार,मेंदूचे विकार,त्वचेचे विकार,रक्ताचे विकार,आॅलर्जीचे विकार,दमा-अस्थमाचे विकार,आणि असे विविध प्रकारचे आजार देशातील करोडो नागरिकांना आहेत.यापैकी बऱ्याच आजारांनी देशातील लाखो नागरिकांना दरवर्षी जिव गमवावा लागला असल्याची,सरकारी आकडेवारी तत्पूर्वी सांगायची.आता ही आकडेवारी उपलब्ध करून दिल्या जात नाही व वरील सर्व प्रकारचे आजार सुध्दा सध्याच्या परिस्थितीत मागे पाडल्या गेले आहेत.वरीलपैकी बऱ्याच भयानक आजारांचा बडेजाव आता सरकारी यंत्रणा करताना दिसत नाही.मेले तर फक्त कोरोणानेच मेले,एवढेच आता सरकारी यंत्रणा व मिडिया वाले पिटूपिटू सांगतात.

कोरोणा बाबतीत वारंवार सांगण्यात येणाऱ्या प्रकारात,मनुष्य मात्रांच्या मनात भितीदायक वातावरण निर्माण करणारा प्रकार जास्त दिसतो आहे तर दिलासा व धिर देणारा प्रकार कमी दिसतो आहे.कोरोणाच्या भितीने बरेच नागरिक अस्वस्थ झाले आहेत,त्यांच्या मनावर जबरदस्त ताण पडला असल्याचे चित्र आहे.एवढेच काय तर सर्व प्रकारच्या समस्या अंतर्गत मानसिक दृष्ट्या बरेच नागरिक खचले असल्याचे दृश्य आहे.

शासन लाॅकडाऊन अंतर्गत संचारबंदी लागू करु शकते व प्रशासकीय यंत्रणा शासनाच्या नियमानुसार आपली जबाबदारी पार पाडू शकते?परंतू नागरिकांच्या मुलभूत समस्यांचे काय? त्यांनी जगावे कसे व रहावे कसे?हा मोठा व जाटील प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.शासन फक्त ५ किलो तांदूळ-गहू देवू शकत,यानंतर शासन काही करु शकत नाही हे शासनाच्या भुमिका वरुन स्पष्ट झाले आहे.पण ५ किलो गहू-तांदूळ दिल्याने नागरिकांच्या इतरेत्र मुलभूत समस्यांचे निवारण होवू शकत नाही,याचे काय?तद्वतच कुणाच्या खात्यात १ हजार ५०० रुपये टाकण्यात आले त्याचाही थांगपत्ता अजून लागलेला नाही.आपदा परिस्थितीत प्रत्येक कुटुंबीयांना सरसकट ५ हजार रुपये दर महा शासन का म्हणून देत नाही?हा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

डॉ.बिश्वरुप राय चौधरी यांनी केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांना खुले आव्हान दिले आहे की कोरोणा हा संसर्गजन्य आजार नसून सौम्य आजार आहे व तुमच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन सक्षम आहे तर कोरोणा आजार संसर्गजन्य आहे हे सिध्द करुन दाखवावे,असेही डॉ.बिश्वरुप राय चौधरी यांचे म्हणणे आहे.सदर डॉक्टरांचे आव्हान केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना का म्हणून स्विकारीत नाही?हाच मुद्दा अनेक नागरिकांच्या मनात बरेच संसय निर्माण करतो आहे.

कोरोणा आजार संसर्गजन्य आहे किंवा नाही,हा मुद्दा बाजूला सारून चालणार नाही,हा मुद्दा देशातील करोडो नागरिकांच्या भविष्यासी निगडित आहे.देशातील नागरिकांचे भविष्य अंधकारमय बनू नये,या अनुषंगाने नागरिकांची मुस्कटदाबी नकोय?