देवूड येथील चरपाट योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या कामाची कायदेशीर चौकशी व्हावी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आयरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

124

*

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी देवूड देसाईवाडी व सावंतवाडी येथे चरपाट योजनेचे सुमारे दोन महिन्यांपूर्वी काम पूर्ण होऊन सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.त्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे.या सर्व कामाची प्रत्यक्ष पाहणी करून व माहिती घेवून पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद अभियंते श्री दाभोळकर व सरपंच श्री देसाई तसेच ग्रामस्थ यांच्या निदर्शनास प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती आणून दाखवली आहे.सदर कामाचे ठेकेदार यांना याबाबत प्रत्यक्ष भेटून सांगितले असता काम करण्याची असमर्थता दाखवली आहे.सदर निकृष्ट कामाची कायदेशीर चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देवून सदर कामाची रक्कम अदा केली नसल्यास ती न देता तसेच दिली असल्यास वसुली करून त्याचप्रमाणे मोजणी रजिस्टरवर केलेली नोंदणी संबंधित विभागाला रद्द करण्याचे आदेश दयावेत.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

*दखल न्यूज भारत*