भारतीय मुस्लिम परिषद तर्फे कु.रझिया शेख चा सत्कार

128

 

वणी : परशुराम पोटे
वणी विधानसभा क्षेत्रातुन १० वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावून मुस्लिम समाजा चे नाव ऊंचवनार्या मुलीचे भारतीय मुस्लिम परिषद तर्फे सत्कार करून गौरवीन्यात आले. शहराती शास्त्री नगर मध्ये राहणार्या ऐका गरीब कुटुंबातील मनसुर शेख यांची मुलगी कु.रझिया हिने एस.पि.एम महाविद्यालयातुन शिक्षण घेतले असुन तीचे आजोबा सेवानिवृत्त मुंख्याध्यापक असुन तीला त्यांच्याकडून व शाळेच्या शिक्षकांकडुन योग्य मार्गदंर्शन मिळाल्याने तीने वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा या तालुक्यातून सर्वात जास्त ७९-६०टक्के गुन घेऊन मुस्लिम समाजाचे नाव लोकिक केले आहे. तर वणीच्या इतिहासा मध्ये मुस्लिम समाजाचा प्रथम मान आहे.हा समाज शिक्षणामध्ये पिछाडलेला असुन या समाजासाठी मोठा आदंर्श आहे.या करीता भारतीय मुस्लिम परीषद तर्फे गुरुवारी दि.३० जुलै ला सायंकाळी ७ वाजता तिच्या घरी जाऊन कु.रझिया चा सत्कार करुन भेटवस्तू दिली. यावेळी तिने आय.ए.एस आॅफिसर बनुन समाजाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे, असे तीने सांगीतले. या संत्कार समारोहा मध्ये भारतीय मुस्लीम परिषद चे नईम अजीज, आसान शेख, रफीक रंगरेज, सलीम खाॅ, सईद खाॅ, इसमाने खाॅन पठान, सै.मुझमिल, जमु खाॅ, अमान भाई, ईसराइल खाॅ, व ईतर मुस्लिम परिषद चे सदस्यांनी या प्रसंगी सोशाल डिस्टेन्शन पाळुन उपस्थित होते.