स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

36

 

वणी : परशुराम पोटे

छत्रपती संभाजी महाराज यांच व्यक्तिमत्त्व म्हणजे हे प्रचंड शूर व पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर एक सक्षम व न्याय प्रिय पद्धतीने त्यांनी शासन चालविले. ते एक न्यायप्रिय शासक, एक युवा ग्रंथकार, बलाढ्य योद्धा, अश्या अनेक विशेषण असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी आहे.
महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारकं संवर्धन समिती वणीच्या वतीने स्थानिक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चौकात त्यांच्या तैलचित्राला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी समितीचे संघटक कासार सागर मुने, समनव्यक लोकसेवक अमित उपाध्ये तसेच दिलीप पेंदोर, सुदाम गावंडे, प्रशांत गाग्रेडवार उपस्थित होते.