वैरागड ग्रामपंचायत मध्ये कोरोना लसीकरण.

212

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – गावात कोरोना (कोविड-19) महामारीचा वाढता प्रादुर्भाव पाहता यावर प्रतिबंध उपाय म्हणून येथील ग्रामपंचायत मध्ये दि.14 मे रोजी कोरोना लसीकरण मोहीम घेण्यात आले. यात 50 नागरिकांनी लसीकरण केले.
ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग यांच्या मार्फतीने 45 वर्षा वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात आले. यात 46 नागरिकांनी पहिला डोज तर 04 नागरिकांनी दुसरा डोज घेतले. लसीचा तुटवड्यामुळे मोहीम समोर ढकलण्यात आल्याचे येथील ग्रामपंचायत सरपंच्या संगीता पेंदाम यांनी सांगितले.
लसीकरण केल्या नंतर ताप येऊन मृत्यू ओढवतो असे भ्रामक चर्चा गावात सुरू आहे. नागरिकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. जास्तीत-जास्त नागरिकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सरपंच्या संगीता पेंदाम यांनी यावेळी केले आहे.