अनुभव शिक्षा केंद्र अंतर्गत अमरावती व वाशिम जिल्ह्या करिता जिल्हा प्रशिक्षक या पदाकरिता मा.श्री. आशिष धोंगडे यांची नियुक्ती

122

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:- युवा संस्थेअंतर्गत अनुभव शिक्षा केंद्र या प्रकल्पाकरिता अमरावती व वाशिम जिल्ह्याकरिता जिल्हा प्रशिक्षण या पदाकरिता मा.श्री. आशिष धोंगडे यांची नियुक्ती करण्यात आली. व तसेच अनुभव शिक्षा केंद्र हे 13 ते 35 वयोगटातील युवकांमध्ये काम करते. तसेच ग्रामीण भागातील युवकांना आपल्या मूलभूत कर्तव्य आणि जबाबदारी कशा प्रकारे पार पडावे. म्हणून अनुभव शिक्षा केंद्र विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये उद्बोधन कार्यक्रम, युवक मेळावा, एक्सपोजर व्हिजिट, YLBC ,महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, आणि तसेच विविध खेळांच्या माध्यमातून व गाण्याच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करण्यात येते.आणि तसेच अनुभव शिक्षा केंद्रचे हे मूल्य आधारित जसे की 1)स्त्री पुरुष समानता 2)धर्मनिरपेक्षता 3)सामाजिक न्याय 4)पर्यावरण न्याय 5) श्रमप्रतिष्ठा या मूल्याला घेऊन युवकांमध्ये युवा अनुभव शिक्षा केंद्र काम करते.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत