क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ली.कंपनीच्या वतीने रत्नागिरीतील पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

113

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यादृष्टीनं सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये कामाला लागलेल्या आहेत. मात्र हे सगळं करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांवर सगळ्यात जास्त ताण येत आहे. पोलिसांना वारंवार नागरिकांच्या संपर्कात राहावे लागत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना नेहमीच तत्पर असावे लागते. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम 24 तास करत आहेत. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात.
या पोलीसांच्या खाकी वर्दीमागील माणसाची काळजी घेत पोलिसांना क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ली. रत्नागिरी कंपनीच्या वतीने रत्नागिरी तालुक्यामधील जयगड पोलीस ठाणेचे API नितीम ढेरे , कारवांचीवाडी ग्रामीण पोलीस ठाणेचे PI विनीत चौधरी तसेच पूर्णगड सागरी पोलीस ठाणेचे PI सुरेश गावित यांच्याकडे कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी मास्क, सँनिटायझर तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण कुटा रत्नागिरी डिव्हीजनल मॅनेजर वैभव धर्मे, एरिया मॅनेजर योगेश कुरणे , ब्रँच मॅनेजर श्रावण बागडी, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

दखल न्यूज भारत