शिक्षक परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोविड कामगिरीवर असणार्‍या मृत कर्मचार्‍यांच्या वारसांना ५० लाखांचे सहाय्यक अनुदान पुन्हा लागू झाले.

94

 

 

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आमदार गाणार सर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई विभाग यांच्यावतीने मा. मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. कोविड ड्युटीवरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ५० लक्ष रूपपयांचे विमाकवच देण्यात यावे, यासाठी शिक्षक परिषदेने शासनाकडे दि. ३.५.२०२१, दि. ९.५.२०२१ आणि दि. १३.५.२०२१ रोजी असा एकूण ३ वेळा पत्रव्यवहार केला होता.
आज दि. १४. ५. २०२१ ला वित्त विभागाने आदेश काढून दि. ३०/६/२०२१ पर्यंत कोविड कामगिरी वरील कर्मचाऱ्यांचा म्रुत्यू झाल्यास ५० लक्ष रुपये सहाय्यक अनुदान वारसांना लागू केले आहे.
पूर्वी ३१.१२.२०२० पर्यंत मृत्यु झालेल्या कोविड कामगिरी वरील कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लक्ष सहाय्यक अनुदान लागू केले होते. त्यानंतरही अनेक शिक्षक कोरोना ड्युटी करत असताना मृत्यु पावले आहेत. अन्य कर्मचारीही मृत्यु पावले होते. शिक्षक परिषदने ही बाब मा. मुख्यमंत्री यांना कळवली होती. आज ती मागणी पूर्ण होऊन दि. ३० जून २०२१ पर्यंत हे ५० लक्ष सहाय्यक अनुदान लागू असणार आहे. तरीही वारसांना हे अनुदान घोषित झाल्यानंतर तात्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.यापूर्वीचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढावेत.
तसेच शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्यात यावे. सर्व ड्युटी वर असणाऱ्या शिक्षकांना लसीकरण ,म्रुत्यू झाल्यास वारसांना अनुकंपा, तात्काळ वैद्यकीय सुविधा, रजा सुविधा लागू कराव्यात. अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे
आमदार नागो गणार, योगेश बन, नरेश कामडे, के.के बाजपेयी,पूजा ताई चौधरी, सुनील पाटील, रंजना कावळे,अजय वानखेडे, विनोद पांढरे,राधेशाम पंचबुद्धे, सुधीर अनवाने, राजेंद्र पटले, सुधीर वारकर, अशोक हजारे,सुरेश रोठे, रामदास गिरटकर, गोपाल मुनघाटे,बीसेन सर, पुंडलिक नाकाडे,मनीषा कोलरकर, ,सुभाष गोतमारे, प्रवीण भोयर,अंगेश बेहलपांडे, मधुकर मुपद्दीवार, गुणेश्वर पुंडे, संतोष सुरावार, दिवाकर पुद्दतवार,विलास बोबडे जुगलकिशोर बोरकर,हेमन्त बेलखेड़े,मेघराज फुलके, अतुल टेकाडे, सतीश कसरे, प्रकाश चुणारकर,विजय साळवे, प्रमोद खांडेकर, अविनाश ताळापल्लीवार ,अमोल देठे,पुरुषोत्तम चौधरी,दिलीप खंडाळ,मोरेशवर गौरकर.योगेश बन,कार्यवाह यांनी केली आहे.