दारूड्यां च्या बंदोबस्ता करीता माथोली येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची ग्राम पंचायत सदस्यांनी केली मागणी

278

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,
ॲड प्रतीक्षा अरुण देऊळकर यांच्या नेतृत्वाखाली समस्त माथोली ग्राम पंचायत सदस्य यांच्या वतीने नुकतेच ग्राम सचिव यांना माथोली येथे पोलीस चौकी स्थापन करण्या बाबत एक निवेदन देण्यात आले.
घुग्घुस येथून जवळच असलेल्या कैलाश नगर ,माथोली व जुगाद या तीन गावंंच्या ऐन मधोमध दोन बियर बार व एक देशी दारू भट्टी आहे. बाजूच्या जिल्ह्यात दारू बंदी असल्याने जिल्ह्या बाहेरचे लोक इथेच दारू पीण्या करिता गर्दी करीत असतात. कोरोना काळात पार्सल ची सुविधा या बार व भट्टी मध्ये शासना द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र हे दारुडे लोक कैलाश नगर कॉलनी मधे कुठेही बसून दारू पीने , शिविगाळ करने व महिलांना बघून अपशब्द बोलणे किंवा अश्लील खानाखुणा करने हे नेहमीचेच प्रकार झाले आहेत.
परिसरात पोलिस चौकी नसल्यामुळे गावातील लोकांना 25 ते 30 किलोमिटर दूर शिरपूर पोलीस स्टेशन इथे जाऊन या प्रकाराची तक्रार करावी लागते. शिरपुरला जाऊन तक्रार देने शक्य होत नाहीं .पोलिसांना या ठिकाणी येण्याकरिता कमी अधिक 45 मिनिटे लागतात, 45 मिनिटात काहीही घडण्याची शक्यता असते. हळूहळू या दारूड्यां ची संख्याही वाढत चालली आहे त्यामुळे कॉलनीत गुन्हेगारी वाढीस लागली आहे .
या आधीही कॉलनीत चोऱ्या , मारामाऱ्या , दारू पिण्याच्या निमित्ताने आलेल्या बाहेरच्या लोकांचे भांडण या सारख्या गोष्टी घडलेल्या आहेत . या गोष्टीं कडे दुर्लक्ष न करता यावर कारवाही करण्यात यावी व कैलाश नगर , माथोली, जुगाद या गावांच्या सुरक्षेसाठी व महिलांच्या सुरक्षेसाठी माथोली गावात पोलीस चौकी लावण्यात यावी अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.