सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन, महाराष्ट्राच्या वर्धा उपजिल्हाध्यक्षपदी विकास भोंगाडे यांची निवड…

71

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

वर्धा :- सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्र राज्याची प्रदेशाध्यक्ष साजिद शेख व जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण यांच्या उपस्थित दि. ०८ मे, २०२१ रोजी गूगल मीटवर ऑनलाईन पध्दतीने झालेल्या बैठकीत सर्वानुमते वर्धा उपजिल्हाध्यक्ष पदी विकास भोंगाडे यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
विकास भोंगाडे यांनी आजपर्यंत समाजकार्याच्या विद्यार्थ्यांसाठीचे कार्य पाहाता त्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी समाज टी व्हि यूट्यूब चॅनल चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी तथा अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे वर्धा जिल्हा संघटक पद्माकर कांबळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनच्या वाढीकरिता जोमाने कार्य करेल. तसेच आपण अंगीकारलेल्या समाजसेवेचे व्रत यापुढेही वटवृक्षाप्रमाणे फैलावत नेऊन समाजास त्याचा छायेखाली घेईल असे विकास भोंगाडे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले. आपल्या हातून देशसेवा, समाजसेवा, घडून समाजातील दुर्बल-दुर्लक्षित विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्वल करावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे अध्यक्ष साजिदजी शेख म्हणाले.
विकास भोंगाडे यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषारजी जाधव यांनी विकास भोंगाडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष साजिदजी शेख, वर्धा जिल्हाध्यक्ष अविनाश चव्हाण व वर्धा जिह्यातील समाज कार्यकर्त्यांनी विकास भोंगाडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.