स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने माऊलींच्या समाधीवर पांडुरंग अवतार

297

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी येथे साडे तीन मुहूर्तापैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर वारकर्‍यांचे श्रध्दा स्थान असलेले श्री क्षेत्र पंढरपूर येथील भगवंत पांडुरंगाचा चंदन रुपी उटी अवतार साकारण्यात आली असून यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आणि स्वकाम सेवा मंडळ यांच्या वतीने पांडुरंगाचा चंदन रुपी उटी अवतार साकारण्यात आला याप्रसंगी मंदीरात आकर्षक मोगऱ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली. ही उटी अभिजीत दहीफले, पुजारी सौरभ चौधरी, मोरेश्वर जोशी आणि योगेश चौधरी यांनी साकारली, या वेळी संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक डॉ.सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, आशा तापकीर, मनसुख लोढा, सुभाष बोराटे, धनाजी तापकीर, ज्ञानेश्वर वहीले, बाळासाहेब गांधीले, संभाजी चौधरी, संभाजी फुगे, संदीप पोटावडे, संतोष आरूडे, मुकुंद कुलकर्णी, सचिन वहीले, धनाजी गावडे, सत्यवान बर्गे आणि स्वकाम सेवा मंडळाचे स्वयंसेवक व सेवकवर्ग उपस्थित होता.