आकोट येथे युवासेने तर्फे छ.संभाजी महाराज जयंती साजरी.

36

 

*अकोट प्रतिनिधी*

अकोट तालुका युवासेने तर्फे छ.संभाजी महाराज जयंती छ.शिवाजी महाराज चौक येथे साजरी करण्यात आली. कोरोना प्रदूभाव पाहता व‌ लाॅकडाऊन‌ असल्या कारणाने मोजक्या शिवभक्ताच्या उपस्थितीत जंयती उत्सव पार पडला. १४ मे म्हणजे छ.संभाजी महाराज जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. दरवर्षी वेगवेगळे उपक्रम‌ राबवून साजरी करण्यात येते. यंदा कोरोना‌ महामारी मूळे लाॅकडाऊन ची घोषणा असलेल्या कारणाने साध्या पध्दतीने छ.संभाजी महाराज जयंती सर्वीकडे साजरी करण्यात आली.
एका हातात शस्त्र दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणारे स्वराज्यरक्षक छत्रपती यांना अभिवादन करत अकोट युवासेने तर्फे मानाचा मुजरा करण्यास आला. यावेळी कुणाल कुलट, अक्षय घायल, श्रीकांत साबळे, शक्ती गिते ,गोपाल पेठेकर, अमीत बेंडेवाल, गोंविद चावरे, निलेश मोगरे, सूचक भांबूरकर, आयुष तिडके, शुभम गिरी, सौरभ बरे, दिनेश सभागचंदाणी आदी शिवभक्त उपस्थित होते.