अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी कामाचा मोबदला मिळणार, संघटनेच्या मागणीला यश…

925

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना आशा स्वयंसेविकांच्या धर्तीवर मोबदला अदा करावा. या मागणीसाठी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी मा. श्री.अभिजित राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आणि अनेकविध निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.परिणामी माझे कुटुंब माझी जबाबदारीचा मोबदला अदा करण्यास जिल्हा प्रशासनाने अनुकूलता दर्शविली होती. त्याअनषंगाने मा. जिल्हाधिकारी यांनी यासंबधी टिपणी मंजूर केली आहे. त्यानूसार दि.२२.०४.२०२१ रोजी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस.पाटोळे यांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेच्या कामाचा मोबदला आशांच्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचारी यांना देण्याबाबत जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांना आदेशित केले आहे.त्यामुळे सदर मोबदला अंगणवाडी कर्मचारी यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संघटनेने केलेल्या प्रयत्नाला मोठे यश आले आले असल्याचे रामकृष्ण बी. पाटील यांनी म्हटले आहे.