श्री साईनाथ विद्यालय मालेवाडा येथे सायकलींचे वितरण

129

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 13 मे 2021 रोजी सायकलींचे वितरण करण्यात आले. मानव विकास मिशन तर्फे दरवर्षी बाहेरगावी राहणाऱ्या मुलींना सायकलींचे वाटप करण्यात येते. श्री.साईनाथ विद्यालय मालेवाडा येथे परिसरातील सुमारे 20 गावांतील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शाळेचे मुख्याध्यापक तथा इतर कर्मचारी आपल्या विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त सायकल मंजूर करून त्यांना शाळेत ये-जा करणे कसे सहज होईल; याचा प्रयत्न करतात. ह्या वर्षी एकूण 52 सायकली मंजूर झाल्यात. त्यापैकी 30 सायकलींचे वितरण आज करण्यात आले.
या वितरण समारंभात मुख्याध्यापक श्री जिभकाटे सर, पर्यवेक्षक वैरागडे सर, लाखे मॅडम, लोथे सर, निंबेकर सर, निकुरे सर, अवचट सर, नैताम सर, साळवे सर,करमरकर सर, वैद्य सर ,खोब्रागडे सर, बोडणे सर इ.चा सहभाग होता.सायकल वितरण करताना वैयक्तिक अंतराचे भान ठेवण्यात आले.