देसाईगंज तालुक्यात कोरोना काळातही सट्टा-पट्टीला आले उधाण… सट्टा-पट्टीधारक मालक चाचा भतिजा व इतर सट्टाकिंग मालामाल तर लावणारे कंगाल… संबंधित विभाग साखर झोपेत का?

445

 

ऋषी सहारे
संपादक

वडसा दि 13 मे-
देसाईगंज शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सट्टा-पट्टीचा अवैधरित्या व्यवसाय वाढीस लागल्याने सट्टा-पट्टी घेणारे मालक चाचा भतिजा व इतर सट्टाकिंग मालामाल तर सट्टा लावणारे कंगाल अशी अवस्था झाली आहे.
देसाईगंजचे नवनियुक्त ठाणेदार डॉ.विशाल जयस्वाल रुजू होताच अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्याने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले व  तालुक्यात दारू विक्रीचे प्रमाण कमी झाले आहे.दारू विक्रीचे प्रमाण तर कमी झाले मात्र सट्टा पट्टीचा व्यवसाय जोमात सुरू झाला असल्याने देसाईगंज व ग्रामीण क्षेत्रात सट्टा लावण्याकरिता रांगा लागल्या दिसून येत आहेत.काहीजण सट्टा लावण्याच्या आहारी जाऊन सर्व जमा पुंजी पणाला लावीत आहेत.सध्या स्थितीत कोरोना वाढीने थैमान घातले असून याला न जुमानता सट्टा लावण्याच्या नादात शासनाच्या निर्देशाचे पालन न करता एकत्र जमाव होऊन बेधुंदपणे सट्टा-पट्टीचा व्यवसाय सुरू आहे.
सट्टा पट्टीच्या व्यवसायाचे जाळे सर्वत्र पसरले असल्याने सट्टा घेणारे स्वतःच्या खोलीत (गुजरीत) सब्जीमंडी वा भाड्याने खोली विकत घेऊन सट्टा पट्टीचा व्यवसाय चालवीत आहेत. यांचा मुख्य सूत्रधार चंद्रपूर वरून रिमोट चालवीत असल्याचे बोलल्या जात आहे.
सट्टा लावण्याच्या आहारी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत गेले असल्याने लाखो रुपयांची उलाढाल दररोज केली जात आहे.दोन आकड्यांवर पैस्याची बाजी लावून नशिबाची किमया ठरवली जाते.धाड सत्रात एका कागदाच्या चिटोऱ्यावर जणूकाही पैज लावलेली दिसून येते.रोजची रोजी रोटी कमावणारे मजूर वर्गही झटपट पैस्याच्या नादात व काही तासात परीक्षेचा निकाल लागत असल्याने सर्वकाही पणाला लावीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.सट्टा पट्टीच्या नादात काहींची संसारही उध्वस्त झालेली आहेत.त्यामुळे अशा या दोन आकड्यांच्या खेळावर धाड सत्र सुरू करून सट्टा पट्टीधारकांच्या मुसक्या आवळणे गरजेचे असून संबंधित विभाग कारवाई करणार का? या कडे लक्ष लागून आहे .