पिक अप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, महिला गंभीर जखमी, मोर्शी येथील घटना

171

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
भरधाव जाणाऱ्या पिक अप व्हॅनची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सोबत असणारी महिला ही गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास मोर्शी बसस्थानकजवळ घडली
भारत गोंडाराम गभने वय 45 वर्ष असे उपचारादारम्यान मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव असून मोर्शी येथील गभने ले आऊट मध्ये राहत होते
भाईपुर येथील शेतात आज फवारणी असल्याने भारत गभने व त्यांची वहिनी शोभा रघुनाथ गभनेसह जेवणाचा डबा घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच 27 सि ए 3058या दुचाकीने शेतात जात असताना मोर्शी बसस्थानकनजीक वरुड येथून अमरावतीकडे माल घेऊन जाणारी बोलेरो पिक अप व्हॅन एम एच 27 बि एक्स 4218या गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिली या धडकेत भारत गभनेच्या डोक्याला गंभीर मार लागला असून दवाखान्यात उपचारादरम्यान भारतचा मृत्यू झाला तर वहिनी शोभा गभने गंभीर जखमी झाली आहे