छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मोफत ऑनलाइन शिबिराचे आयोजन राजे छत्रपती संभाजी महाराज स्पर्धा परीक्षा अकोट चा स्तुत्य उपक्रम

84

 

अकोट प्रतिनिधी

स्थानिक आकोट येथील राजे छत्रपती संभाजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक राजीव खारोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब दिव्यांग अनाथ विद्यार्थी तसेच विधवा विधवा घटस्फोटित महिला यांना तब्बल एक वर्ष मोफत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचे उद्घाटन दिनांक 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केले आहे. या शिबिराला समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी प्ले स्टोअर जाऊन
ऑनलाइन Coaching App डाउनलोड करण्याकरीता खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क साधून मो. 9766624767/9404670767 आपणास शिकवल्या जाणारी एक लिंक मिळेल. त्या लिंक द्वारे आपणास घरी बसून मोफत ऑनलाइन स्पर्धेचा लाभ मिळेल., असे राजे छत्रपती संभाजी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक श्री राजीव खारोडे यांनी केले.

प्रशिक्षणाचे रजिस्ट्रेशन असे करावे…!!!

सर्वात आधी आपला मोबाईल नंबर आणि नाव 9766624767/9404670767 या
दिलेल्या खालील मो. नंबर वर एसएमएस करून आपणास लींक मिळेल. त्यानंतर आपलं नाव आणि मोबाईल नंबर पाठवावा. नोंदणी रजिस्ट्रेशनची दिनांक 14 मे ते 31 मे पर्यंत असून 1 जून पासून ही स्पर्धा परीक्षा चालू होणार आहे. तरी गरजवंतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन छत्रपती संभाजी अकॅडमीचे संचालक राजीव खारोडे यांनी केले.