विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पदावर अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची वर्णी लावण्यात यावी आविसं सल्लागार रविभाऊ सल्लम यांची महाविकासआघाडी सरकारकडे मागणी

 

सिरोंचा….विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांच्या सर्वांगीण व समतोल विकासासाठी विदर्भाच्या विकासासाठी गठित करण्यात आलेल्या विदर्भ वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देऊन महामंडळासाठी आवश्यक निधीची नियोजन करून या महामंडळाच्या अध्यक्ष पदावर आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची वर्णी लावण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारकडे आदिवासी विद्यार्थी संघाचे सल्लागार रविभाऊ सल्लम यांनी केली आहे.

अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम हे विद्यार्थी दशेपासूनच आदिवासी विद्यार्थी संघ नावाचं संघटना बनवून या संघटनेची विदर्भातल्या अकरा जिल्ह्यामध्ये त्यांनी विस्तार केले.या संघटनेच्या नावाखाली विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये अनेकदा विद्यार्थी चळवळीसह विदर्भातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलन छेडले. विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांमधील आदिवासी समाजासह इतर समाजात त्यांची ओळख असून विदर्भात आजही आदिवासी विद्यार्थी संघाचे नावाने विदर्भात अनेक सामाजिक कार्ये सुरू असून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचं बळावर पाच वर्षांसाठी अहेरी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले होते .दिपक दादा आत्राम हे आपल्या पाच वर्षांचं आमदारकीच्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रातील पाच ही तालुक्यांच्या समतोल विकास घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.माजी आमदार दिपक दादा आत्राम हे सामाजिक व राजकीय क्षेत्राचे अभ्यासू वक्ता असून आदिवासी समाजातील उच्छशिक्षीत युवा नेतृत्व आहे.त्यांना विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांची भौगोलिक,सामाजिक व आर्थिक स्थितीची जाणीव असून अश्या स्वाभिमानी व निःस्वार्थ सेवाभावीकडे सदर महामंडळाचे अध्यक्ष पद दिल्यास नक्कीच विदर्भाचा समतोल विकास होणार अशी आम्हाला आशा व त्यांच्याकडून अपेक्षा ही आहे.
विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांची आजही पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेलं नसल्याचे आरोप नेहमी जनतेतून होत असतात.
विदर्भातल्या अकरा जिल्ह्यांच्या सर्वांगीण व समतोल विकासासाठी विदर्भ वैधानिक विकास महामंडळ हे महत्वपूर्ण महामंडळ असून या महामंडळावर अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या सारख्या अभ्यासू व्यक्तिमत्व व सर्वसमावेशक नेत्याची जर अध्यक्ष म्हणून वर्णी लावल्यास वर्षानुवर्षे विकासापासून वंचित असलेल्या विदर्भतल्या अनेक वस्त्या,तांडे व ग्रामीण भागातील हजारो गावांच्या झपाट्याने विकास होईल. म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिवसेनापक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार,काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांनी सकारक्तामक पणे विचार करून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देऊन विकासकामांसाठी आवश्यक निधीची नियोजन करून महामंडळाचे अध्यक्ष पदावर अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम वर्णी लावण्याची मागणी आविस सल्लागार रविभाऊ सल्लम यांनी केली आहे.