ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांची भेट. कोविड बद्दल माहिती घेतली असता सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे डाँक्टर यांनी सांगितले.

76

 

सदाशिव माकडे (प्रतीनीधी)

भामरागड :
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख मा.किशोर पोतदार तसेच गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख मा.रामकृष्ण मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ मे रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सदस्य, जिल्हा नियोजन समिती गडचिरोली मा.राजगोपालजी सुल्वावार यांची ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे भेट दिली व कोविड बद्दल माहिती घेतली असता डाँक्टर यांनी सांगितले की आमच्याकडे सर्व सोय उपलब्ध आहे असे सांगितले व तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी तेथील डाँक्टर यांना सांगितले की रुग्णांना काही कमी पडू देणार नाही काही असल्यास आम्हाला कळवावे व आम्ही पालकमंत्री शिंदे यांना कळणार असं डाँक्टर यांना सांगितले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अहेरी (ग्रामीण) सुभाषजी घुटे, शिवसेना तालुका प्रमुख भामरागड खुशालजी मडावी, शिवसेना शहर प्रमुख नासीरजी शेख, वेंकटेश कंदीवार, महेंद्र सुल्वावार हे उपस्थित होते.