कोरोना काळात जनतेच्या अडचणीकडे लक्ष ठेवणारा सभापती विजय कोरेवार..

62

 

सुधाकर दुधे
सावली – देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या संकटकाळात आपापल्या परीने पदाधिकारी, अधिकारी काम करीत खरे उतरत आहेत. लोकप्रतिनिधी म्हटले तर त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये उलट भावना असते. परंतु सावली पंचायत समितीचे सभापती विजय कोरेवार हे कोरोना काळातही जनतेची कामे करीत असल्याने इतर लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा सवाल जनता करीत आहे.
सामाजिक जण असलेले चळवळीचे कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले विजय कोरेवार तालुक्यात परिचित आहेत. सभापती पद मिळाले आणि कोरोनाला सुरवात झाली. अनेक पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या काळात काय करायचे हे माहीत नाही. परंतु सभापती कोरेवार यांनी मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात मिरची तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांशी सतत संपर्कात राहून धीर देण्याचे काम केले, गावागावात कोरेन्टाईन ठेवलेल्या मजुरांशी सतत संपर्कात होते. रुग्णांना रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी पंचायत समितीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावर्षी आणखी कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. याही काळात प्रशासन व नागरिकांसोबत सतत संपर्कात राहून काम करीत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात व सोशल मीडियाचे माध्यमातून कोरोना टेस्टिंग करण्याचे आवाहन, लस घेण्याचे आवाहन, लस उपलब्ध असल्याची माहिती वेळोवेळी देत असतात. लसीकरणाबाबत आदिवासी भागात गैरसमज असल्याने स्वखर्चाने गाडी लावून लसीकरण करून घेतले. इतर होत असलेल्या बोगस बांधकामाकडेही लक्ष असून अनेक कामाची तक्रारी करून दर्जेदार काम करवून घेतात. मेहा बूज येथील सोशल मीडियावरील पोस्ट पाहून गावात शिबीर लावले व गावतही भेट दिली. सावली, पाथरी, निफन्द्रा कोविड सेंटरला भेटी देऊन आरोग्य विभाग व बाधित रुग्णांना धीर देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या कामामुळे इतर लोकप्रतिनिधी कुठे आहेत असा सवाल तालुक्यातील नागरिक करीत आहेत.