ब्रेकिंग न्यूज कर्तव्यावर असलेल्या डाँक्टर ला मारहाण प्रकर्णी कांग्रेसचे माजी आमदार चे पुत्र लारेन्स गेडाम वर गुन्हा दाखल व अटक

2782

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी दि 13 मे-
कांग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना मारहाण केली. पोलीसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला व अटक केली.
गुंड प्रवृतीचा लारेन्स गेडाम याने कोविड सेंटर वर जाऊन येथे मागील दोन महिन्यापासून कोविड केंद्रातच मुक्काम करून रुग्णांना सेवा देणारे युवा डॉ. अभिजित मारबते यांच्या सोबत कारण नसताना मारहाण केली आहे. या केंद्रात डॉ अभिजित मारबते हे सतत ड्युटी करीत आहेत. त्यांनी एकही दिवस सुट्टी न घेता तसेच केंद्रात राहून रुग्णाची अहोरात्र सेवा करीत आहेत.
कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा हा गुंड प्रवृतीचा असून विधानसभा निवडणुकीत त्याच्यावर उमेदवार बग्गु ताडाम यांचे अपहरण करण्याचा गुन्हा लारेन्स गेडाम वर दाखल झाला आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे उमेदवार तथा माजी आमदार आनंदराव गेडाम यांना मुलासह पूर्ण निवडणूक प्रचार होई पर्यंत फरार व्हावे लागले होते. सर्वोच्च न्यायालयाने यांचा जामीन नाकारल्याने ते स्वतःहून कोर्टात हजर झाले. लारेन्स गेडाम हा जामीनावर आहे.हे विशेष.
लारेन्स गेडाम याचेवर पोलिसांनी 353 व 332 कलमान्वये गुुुुन्हा दाखल करून अटक केली आहे. रात्री 12 चे सुमारास अटक झाल्याचे समजते. पोलीस स्टेशन आरमोरी येथे नागरिक पोहचले.त्यानंतर आरमोरी पोलीसांनी लॉरेन्स गेडाम याचेवर मारहाणीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली असल्याचे समजते.