अवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट

0
92

गुणेश शाहारे तालुका प्रतीनिधी दखल न्यूज, देवरी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आठ दिवसापासून ढगाळ वातावरण होते आणि अधूनमधून विजांच्या कडकडासह पावसाच्या सरी बरसत होत्या. परंतु आज पावसाने अक्षरशः कहरच केला. विजांच्या कडकडासह पावसांच्या सरीवर सरी बरसल्या. त्यामुळे बळीराजाचे रब्बी हंगामातील सर्व पिकांचे फार मोठे नुकसान झाले. आधीच एकतर कोरोनाच्या संकटात सापडलेल्या सामान्य माणसाच्या जिवनात या अशा अवकाळी पावसाने अधिकच भर पडली. त्यामुळे शासन स्तरावर अवकाळी पावसाने झालेल्या रब्बी हंगामातील पिकांचे त्वरित पंचनामे करून बळीराजा ला आर्थिक मदत करण्यात यावी. जेणेकरून त्याला खरिप हंगामात पेरणी करण्यास मोठे हातभार लागेल.