शेतातून चोरी गेलेला 150किलो लसून एकूण किंमत 15000रू.हिंगणघाट डी.बी.पथकाच्या कारवाईत जप्त.-

78

उपजिल्हा प्रतिनिधी-सैयद

जाकिर……दि.11/05/2021 रात्रीला अग्यात चोरट्याने देवानंद मोहारे यांच्या शेतातून पाच कट्टे लसून वजन 150किलो किंमत 15000रू.चोरी गेल्याची फिरयाद देवानंद मोहारे यांनी पो. स्टेशन हिंगणघाट येथे केली.त्यानूसार अपराध क्र.0442/2021कलम 461’380 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हा दाखल होताच हिंगणघाट गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पो.हवलदार शेखर डोंगरे यांनी आपल्या पथकासह शोध मोहिम सुरू केली.शोध करीत असतांना त्यांना भीमनगर वारड येथील अमोल वढे या इसमावर संशय आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर चोरीची कबूली दिली.चोरीचा माल पाच कट्टे लसून आपल्या घरी लपवून ठेवल्याचे त्याने सांगितल्याप्रमाणे सदर पाच कट्टे लसून किंमत 15000रू. जब्त करण्यात आला.सदरची कारवाई पो.अधीक्षक प्रशांत होलकर,पो.निरिक्षण संपत चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली शेखर डोंगरे,निलेश तेलरांधे, सचिन घवंदे,विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली.