गांधीनगर येथून मुद्देमालासह १ लाख रुपयांची दारू जप्त

398

 

पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
मो.बा.८३२९८९५३९९

*देसाईगंज* – दिनांक १२/०५/२०२१ रोजी मा. अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली, मा. समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली, व मा. जयदत्त भवर उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा यांचे मार्गदर्शनात व डॉ. विशाल जयस्वाल पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देसाईगंज यांचे नेतृत्वात डी.बी स्टाटचे मार्फत कार्यवाही करण्यात आली.
गांधीनगर येथून दोन चाकी वाहनाने अवैध दारू साठा वाहतूक करतांना पोलीसांनी आरोपींना पकडले असून त्यामध्ये देशी दारू संत्रा कंपनीचे दोन चुकंड्यामध्ये २८० सीलबंध निपा विक्री किंमत प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे २८,००० हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वारलेली निळसर पांढरे पट्टे, असलेली लाल, काळ्या रंगाची एच एफ डीलक्स कंपनीचे वाहन अंदाजे किंमत ५५,००० हजार रुपये, गुन्ह्यात वापरती निळ्या व काळ्या रंगाची होंडा स्पेल्डर प्लस कंपनीची विना नंबर असलेली दुचाकी वाहन, किंमत अंदाजे ५८,००० हजार रुपये असा एकूण १,४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अजय मंगल मोहूर्ले वय ३२, विनोद श्रीराम अलोने वय ४० वर्ष , सोनू भास्कर नखाते वय २४ वर्ष , राकेश वसंता कुर्वे वय २६ वर्ष सर्व रा. गांधीनगर ता. देसाईगंज जि. गडचिरोली येथील रहिवासी आहेत.
या आधी सुद्धा पोलीस विभागाने आरोपी अजय मंगल मोहूर्ले व विनोद श्रीराम अलोने यांच्याकडून या चार दिवसांपूर्वी सुद्धा गांधीनगर येथील इटीयाडोह कालवा मार्गाने दारू आणतांना रंगेहात हात पकडले होते. त्यांमध्ये सुद्धा अंदाजे मुद्देमालासह २ लाख रुपयांची दारू पकडण्यात आली होती.