श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा

66

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):- दि १०मे – वंचितांचे कैवारी,लोकनायक, बहुजन नायक, बहुजनहृदय सम्राट आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने वंचित बहूजन आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन दर्यापूर तालुक्याच्या वतीने आज स्वाभिमान सप्ताह अंतर्गत शाखा सांगळुद येथे वृक्ष लागवड करण्यात आले आहे.
ह्यावेळी प्रामुख्याने उपस्थिती वंचित बहुजन आघाडी दर्यापूर तालुकाध्यक्ष संजीवनजी खंडारे, मा.सरपंच गोपालजी नवलकार, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य अरुनजी गावंडे, येवदा सर्कल प्रमुख ब्रम्हानंदजी गावंडे, प्रशांतजी गावंडे,
महाराष्ट्र सचिव तथा जिल्हाध्यक्ष अंकुश साहेबराव वाकपांजर, सम्यक विद्यार्थी आंदोलन दर्यापूर तालुकाध्यक्ष सुमेध खंडारे,
ऑल इंडिया पँथर सेना दर्यापूर तालुका प्रमुख चेतन कांबळे, बन्सी रायबोले, संजय दुदंडे, बलदेवजी गावंडे,पुरुषोत्तमजी गावंडे, राजकुमार गावंडे, आकाश खंडारे,शुभम कांबळे, रोहन गावंडे,दर्शन गावंडे,त्रिशरण गावंडे,जय शिंदे,सनी गावंडे, गौरव वानखडे, सौरभ गावंडे, शुभम गावंडे, सचिन पाखरे, प्रदीप चक्रनारायण पदाधिकारी, सहकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित होते.

वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना निरोगी व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा सर्वांनी देऊन या वर्षात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.